उस्मानाबाद/प्रतिनिधी -  

शोषखड्डे घोटाळ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हावरगाव येथील तत्कालीन सरपंच यासह 4 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. हावरगावचे

तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, तांत्रिक अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. 

तत्कालीन सरपंच चक्रधर साहेबराव कोल्हे, ग्रामसेवक  शंकर लक्ष्मण सोनोने यासह तत्कालीन तांत्रिक अधिकारी सुधीर बंडगर, ग्रामरोजगार सेवक हंसराज रुस्तम जाधव या 4 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ग्रामसेवक सोनोने हे अकोला जिल्ह्यातील तोलारा तालुक्यातील पंचायत समिती येथे कार्यरत आहेत.

5 जून 2014 ते 10 सप्टेंबर 2014 या काळात आरोपीनी आपसात संगणमत करून शोष खड्ड्याचे काम न करता शासकीय 1 लाख 90 हजार 207 रुपयाचा अपहार केला तसेच ग्रामसेवक शंकर लक्ष्मण सोनोने यांनी शोषखड्ड्याचे कामाबाबतचे मोजमाप पुस्तिका कॅशबुक , कामाचे अंदाजपत्रक, प्रमाणके व अनुषंगिक अभिलेखाची संचिका असे कागदपत्र नष्ट केले यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रामेश्वर खानाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पाटील करीत आहेत.

कळंब पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तुकाराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,409,406,201,34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 2014 साली 1 लाख 90 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top