उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पवनराजे हायात असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर राजकीय अन्याय झाल्यामुळे त्या अन्यायाविरोधात पवनराजे मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली होती. पवनराजे या मित्रमंडळाच्या जीवावर २००४ मध्ये विजयाच्या टप्प्यात आले होते, असे असताना त्यांच्या माघारी पवनराजे मित्रमंडळ यांना खासदार आेमराजे निंबाळकर योग्य सन्मान देत नसल्यामुळे मित्रमंडळ बरखास्त करून पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आमचा गट बाळासाहेबांची शिवसेना मध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत शामिल होणार आहोत, अशी माहिती मित्रमंडळाचे शाम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी पवनराजे मित्रमंडळाचे अध्यक्ष काकासाहेब खोत, सत्यनारायण लोमटे, तेरणा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रमाकांत टेकाळे आदी उपस्थिती होते. पुढे बोलताना शाम कुलकर्णी यांनी उस्मानाबाद व कळंब तालुक्यात मिळुन मित्रमंडळाचे १८८ शाखा आहेत. ८ हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते जोडले गेले आहेत. पवनराजे यांना राजकीय वाटचालीत साथ दिली. त्यांच्या दुर्दैवी हत्येनंतर मित्रमंडळाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना वेळोवेळी मदत केली. परंतू त्यांनी मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कसली ही मदत केली नाही, असा आरोप ही शाम कुलकर्णी यांनी केला. 

डिसेंबरमध्ये ढोकीत मेळावा घेणार

डिसेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ढोकी येथे भव्य मेळावा घेणार आहे. त्यावेळी आमची पुढील दिशा ठरवली जाईल लवकरच आपण पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिसेंबर मध्ये घेण्यात येणाऱ्या मेळाव्या संदर्भात निमंत्रण देणार असल्याचे सांगण्यात आले.


 
Top