उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. याच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खा. गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेस जोडे मारले. दरम्यान, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. तसेच स्वतंत्र्यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिलेले असून त्यांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेली आहे. मात्र खा.गांधी हे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात नफरत पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. गांधी यांची सुरु भारत जोडो यात्रा तात्काळ थांबवावी अशी मागणी केली.

यावेळी कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, शिंदे फडणवीस सरकारच्या समर्थनार्थ घोषणा देत. खा गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यावेळी बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, उस्मानाबाद तालुका प्रमुख अजित लाकाळ, राजाभाऊ पवार, अनंत भक्ते, गुणवंत देशमुख, शंकर थोरात, कमलाकर दाणे, जयराम चव्हाण, बालाजी पवार, दिलीप थोरात, केदार मैरान, गणेश घोणे, अक्षय माळी, योगेश तुपे, अविनाश टापरे, बालाजी सुर्यवंशी, कुणाल धोत्रेकर, रजनीकांत माळाळे, संकेत हाजगुडे, ओंकार मैराण, खंडू मासाळ, सागर पडवळ, अजिंक्य आगलावे, गणेश जाधव, दिनेश तुपे, बालाजी कदम, सचिन मडके, नंदू मासाळ, ज्ञानेश्वर ठवरे, बबलू देवकते, प्रमोद ठवरे, शुभम पांढरे, आकाश देवकते, विक्की शेरकर, गोविंद सुर्यवंशी आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. 

 
Top