तुळजापूर / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आणि राजमाता जिजाऊ यांनी प्रशिक्षण दिलेली लाठी चालवण्याची कला ही महाराष्ट्रामध्ये अलिप्त होत चालली असल्याने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळजापूर येथे महाराष्ट्र लातूर असोसिएशन आणि व धाराशिव शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने दिनांक 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय लाटी अजिंक्य क्रीडा स्पर्धा श्रीनाथ लॉन्स येथे घेण्यात येणार आहेत

असे दिनांक 18 रोजी येथील रेस्ट हाऊस मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये सांगण्यात आले यावेळी महाराष्ट्र लाठी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनिल सगर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामलताई पवार - वडणे, शिवसेना नेते शाम पवार, लाठी इंडियाचे तांत्रिक प्रशिक्षक महंमद रफी शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती

 या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 22 जिल्ह्यातील स्पर्धकांचे प्रवेश निश्चित झाले असून आतापर्यंत 350 विद्यार्थ्यांचा सहभाग पूर्ण झाले असून अजून स्पर्धक वाढण्याची शक्यता आहे जवळपास 500 पर्यंत विद्यार्थ्यांचा सहभाग होईल असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे ही स्पर्धा  वय वर्ष पाच वर्षापासून ते तीस वर्षे वयोगटाच्या मुला मुलींसाठी खुल्या ठेवण्यात आलेले आहेत. आयोजकांच्या वतीने विद्यार्थ्यांची राहण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे.

 
Top