उमरगा/ प्रतिनिधी-

 तालुका विधी सेवा समिती, उमरगा, विधीज्ञ मंडळ, उमरगा व आदर्श विद्यालय, उमरगा यांचे संयुक्त विद्यमाने,  भारतीय संविधान दिनानिमित्त कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री.डि. के. अनभुले, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश - 1, उमरगा हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून 1. मा. श्रीमती एम.डी. चराटे - हंपे, दिवाणी न्यायाधीश व स्तर, उमरगा 2. मा. सौ. एस. ए. कानशिडे, सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, उमरगा 3 मा. सौ. एस. एच. राठी सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, उमरगा 4. मा. श्रीमती एम. पी. मथुरे 2 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, उमरगा तसेच उमरगा विधीज्ञ मंडळाचे सचिव मा. अॅड. एस. पी. इनामदार, मा. अॅड. व्ही. एस. आळंगे, मा. अॅड. सौ. एस.ए. पोतदार, अॅड. कु.एस.एस. सुरवसे, प्राचार्य श्री. सोमशंकर महाजन,

मुख्याध्याक श्री. एस. ए. औसेकर हे उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त चित्रकला व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते 1. मा. अॅड. कु. एस. एस सुरवसे यांनी भारतीय संविधान या

ला विषयावर मार्गदर्शन केले व सौ. एस. ए. पोतदार यांनी बालसंरक्षण कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी श्री. डि. के. अनभुले, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश-1, उमरगा यांनी अध्यक्षीय भाषणात भारतीय संविधानानुसार भारतीय नागरीकांना देण्यात आलेले अधिकार तसेच बाल संरक्षण कायदा व बाल शिक्षण हक्क या विषयावर मार्गदर्शन केले.nकार्यक्रमाचे वेळीचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक मार्गदर्शन मा. अॅड. श्री. एस. पी. इनामदार यांनी केले व आभार प्रदर्शन प्राचार्य श्री सोमशंकर महाजन यांनी केले.


 
Top