उमरगा/ प्रतिनिधी-

 उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय , एनसीसी विभाग व 53  महाराष्ट्र बटालियन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीसी दिना निमित्ताने आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

  याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . जी एच जाधव होते.यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कला शाखेचे उपप्राचार्य डॉ . डी व्ही थोरे उपस्थित होते तसेच विशेष उपस्थितीमध्ये 53 महाराष्ट्र बटालियन चे श्री दादा मुठे ( हवालदार ) व श्री हरी गायकर (हवालदार) उपस्थित होते. तसेच  माऊली ब्लड बँक लातूर येथील श्री बालाजी जाधव, संदीप ढोपरे रोहिणी कातळे , ऐश्वर्या देशमुख, बालाजी नरहरे व श्रीदेवी कांबळे यांची उपस्थिती होती. रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. डी व्ही थोरे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे व रक्तदानातुन राष्ट्रीय भावना  निर्माण होते . असे प्रतिपादन केले . महाविद्यालयातील डॉ. विलास इंगळे व प्रा.शैलेश महामुनी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी 37 कैडेटसनी रक्तदान केले. शेवटी प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव यांनी अध्यक्षीय समारोप केला. सदरील रक्त रक्तदान शिबिरासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी , प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी श्री बालाजी जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .पी डी पाटील सर यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन एनसीसी चे कॅप्टन डॉ. चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या कॅडेटसनी पुढाकार घेतला व रक्तदान शिबिर यशस्वी पार पडले.


 
Top