तुळजापूर/ प्रतिनिधी-

श्री तुळजापुर तिर्थक्षेत्राच्या नविन विकास आराखड्या संदर्भाने माजी सचिव राधेश्याम मोपलवार  हे रविवारी दि ६रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर  ला आले असतां.त्यांना विकास आराखड्यामध्ये सुसज्ज असे नाट्यग्रहाचा समावेश करावा असे निवेदन देण्यात आले. 

हे निवेदन डाँ बाबासाहेब आंबेडकर विधापीठ अधीसभा सदस्य  प्रा. संभाजी  भोसले, इतिहास परिषद अध्यक्ष  डा..सतीश कदम ,  सामाजिक  कार्यकर्ते आनंद कंदले यांनी  दिले.  या पूर्वीच्या तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या आराखड्यामध्ये वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा नाट्यसभागृहाची निर्मिती केली नाही . त्यामुळे असंख्य कलावंताची ईच्छा असून सुद्धा तुळजापूर तिर्थक्षेत्री आपल्या कलेचे सादरीकरण करू शकत नाही त्यामुळे , नविन विकास आराखड्या मध्ये सातशे ते हजार आसन क्षमता असणारे सुसज्ज अशा नाट्य सभागगृहाचा नविन अराखड्या मध्ये समावेश करण्यासोबत अन्य मांगण्याचे निवेदन दिले. 


 
Top