तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तुळजापूर विकास आराखडा तयार केल्यानंतर आपल्याशी चर्चा करुन मगच फायनल करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन श्री राधेश्याम मोपेलवार कार्यकारी संचालक MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,मुंबई यांनी रविवार दि ६ रोजी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांच्या सुचने नुसार व्यापारी पुजारी  नागरिक यांच्या झालेल्या बैठकीत केले.

श्री राधेश्याम मोपेलवार कार्यकारी संचालक MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,मुंबई यांनी रविवार दि ६ रोजी सकाळी  तुळजापूर येताच प्रथम देवीदर्शन घेतले ,नंतर तुळजापूर विकास कामांन बाबतीत पुजारी,व्यापारी,सुज्ञनागरीक यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या सुचना ऐकुण घेतल्या काहीनी निवेदन माध्यमातून यावेळी मोपलवार यांच्याकडे आपल्या सुचना मांडल्या. 

 या बैठकीला श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे सह संबंधित अधिकारी वर्ग, तिन्ही पुजारी मंडळ, पदाधिकारी,  व्यापारी,  नागरिक उपस्थितीत होते.


 
Top