उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

 यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. राज कुलकर्णी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कुलकर्णी यांनी भारतीय राज्यघटना निर्मिती संदर्भात सखोल माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी पी. एन. पाटील, आदर्श विद्या मंदिरचे मुख्याध्यापक एन. व्ही. शिंदे , उपप्राचार्य एस.डी. गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन यू. एम. शिंदे यांनी केले. एस. डी. गायकवाड यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

 

 
Top