तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी तक्रार निवारण समितीमार्फत आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूर न्यायालयातील दिवाणी सहन्यायाधीश पी.एस.जी. चाळकर या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका विधीतज्ञ  मंडळाचे अध्यक्ष अँड.दत्तात्रय घोडके ,अँड. संगीता कोळेकर,अँड. विश्वास डोईफोडे ,अँड. सदानंद आलुरकर , अँड. सुरेश कुलकर्णी हे उपस्थित होते. 

 महाविद्यालयातील किरण शिंदे ,शिवलंग चौधरी, वैष्णवी जाधव, आकांक्षा गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त करून महिला बद्दल आजच्या पिढीने आदर राखणे गरजेचे आहे ,असे सांगितले.  अँड.संगीता कोळेकर यांनी समाजात महिलांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते ही दिली जाणारी वागणुक बदलण्याचे काम युवक वर्गात आहे.  यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी .अँड. दत्तात्रय घोडके व  .अँड. विश्वास डोईफोडे  यांनी महिला हिंसाचार वर मार्गदर्शन केले. 

 अध्यक्षीय भाषणात दिवाणी सहन्यायाधीश चाळकर यांनी भारतीय संविधानात महिलांच्या संरक्षणासाठी कशाप्रकारे कायदा केला आहे. याची माहिती महिलांना होणे गरजेचे आहे. समाजात महिलावर होणारे अत्याचार, लैंगिक  छळ ,छेडछाड, मारहाण असे प्रकार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून यासाठी महिला हिंसाचार रोखण्यासाठी कोणता कायदा आहे याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैष्णवी भट या विद्यार्थिनींनी केले. प्राचार्य रवी मुदकन्ना यांनी  स्वागत केले. प्रास्ताविकेत छाया घाडगे यांनी केले. यावेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक , प्रबंधक कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी   हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

 
Top