उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात संविधान दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ .नितीन गायकवाड यांनी संविधानाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व भारतीय लोकांनी अधिकाराबरोबरच कर्तव्याचे देखील पालन करावे असे प्रतिपादन त्यांनी केले.

 ते पुढे म्हणाले की, संविधान हे केवळ नियमांचा संच नाही तर तो राष्ट्रीय ग्रंथ आहे.  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.   यानंतर सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी  यांच्याकडून उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.   सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.


 
Top