उस्मानाबाद  / प्रतिनिधी-  

सोलापूर - तुळजापूर- उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर करण्यात येऊन यासाठी राज्य शासनाने ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने त्यांचा वाटा दिल्याने पुढील प्रक्रिया जलद गतीने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुळजापूर येथील जाहीर सभेत तिर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वे नकाशावर आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मंुबईत ऑनलाईन पध्दतीने  सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रॅल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ तत्कालीन मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी हा कार्यक्रम घडवून आणला होता. त्यानंतर भाजप-सेना युतीमध्ये बेबनाव झाल्यानंतर या कामाची गती मंदावली होती. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या मागणीनुसार  शेवटच्या टप्प्यात सोलापूर- तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी मंत्रीमंडळात ठराव घेण्याची प्रक्रिया चालू केली होती. सध्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी भुसंपादनाचे काम चालू आहे. परंतू या कामाला म्हणावी अशी गती नाही, त्यामुळे लोकांत नाराजी पसरली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने मागणी करून या रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारचा वाटा देण्याचा ठराव मंजुर करून घेतला. 

अतिरिक्त ताण कमी होणार

सोलापूर- तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी केंद्र व राज्य सरकार ने गती देणे आवश्यक आहे. हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू झाल्यास सध्या ज्या रेल्वे मार्गावर अतिरिक्त ताण पडत आहे. तो कमी होईल. या मार्गावर तुळजापूर-पंढरपुर सारखे तिर्थक्षेत्र असल्यामुळे भाविकांची या रेल्वेमार्गामुळे सोय होणार आहे.

 
Top