उस्मानाबाद  / प्रतिनिधी-  

 भारतीय रोलर स्केटिंग महासंघ आणि कर्नाटक रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने बेंगलोर येथे ११ ते २५ डिसेम्बर दरम्यान होत असलेल्या रोलर स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धेत इनलाईन हॉकी प्रकारातून महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात उस्मानाबादचे अजिंक्य जाधव आणि अमित बहिरे यांची निवड झाली असून उस्मानाबाद जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव प्रवीण गडदे यांची पंच म्हणून निवड झाली असल्याचे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष्य पी. के. सिंग यांनी एक पत्रकाद्वारे जिल्हा संघटनेस कळविले आहे.

दिल्ली येथे झालेल्या लेवल २ जजेस सेमिनार मधील गुणांकावर  पंच म्हणून प्रवीण गडदे यांची भारतीय रोलर स्केटिंग महासंघाने निवड केली आहे. पुणे येथे झालेल्या निवड चाचणी आणि स्पर्धा पूर्व शिबिरातून स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष्य पी. के. सिंग यांनी निवड केली आहे.

दरम्यान रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ उस्मानाबादच्या वतीने संघटनेचे स्पर्धा विभाग प्रमुख किरण शानमे यांच्या हस्ते संघटनेचे कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, कोच कैलास लांडगे यांच्या सह खेळाडूंच्या  प्रमुख उपस्तिथित प्रवीण गडदे, अजिंक्य जाधव आणि अमित बहिरे यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top