उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आमदार राणा जगजितसिंह पाटील   यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथे दिनांक ३० ऑक्टोबर रोजी भव्य राज्यस्तरीय म्हैस पळविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये ३८  पशुपालकांनी त्यांच्या पशुनां सहभागी केले होते.  यामध्ये बेळगाव, मिरज, कोल्हापूर, सांगली, सातारा, तुळजापूर, मोहोळ, वैराग, मंगळवेढा अशा अनेक ठिकाणाहून पशुधनासह पशुपालकांनी सहभाग घेतला होता.

 मिरज येथील  अण्णाप्पा रामू हराळे यांच्या म्हशीने १ मिनीट २९ सेकंदात १ किलोमीटरचे अंतर पुर्ण करून  प्रथम क्रमांक पटकावत रुपये ३१ हजाराचे रोख पारितोषिक जिकंले. श्री. राहुल सूर्यवंशी कोल्हापूर यांच्या म्हशीने १ मिनिट ३० सेकंदात निर्धारित एक किलोमीटरचे अंतर पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला. श्री. सुनील तिवारी लातूर यांच्या म्हशीने १ मिनिट ते ३० सेकंदात निर्धारित अंतर पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावला.  श्री. प्रमोद गवळी तुळजापूर यांच्या म्हशीने १ मिनिट ३४ सेकंदात निर्धारीत अंतर पूर्ण करून चतुर्थक क्रमांक मिळविला.  श्री. अक्षय जमदाडे तुळजापूर यांच्या म्हशीने १ मिनिट ३८ सेकंदात निर्धारीत अंतर पूर्ण करून पाचवा क्रमांक मिळविला. सर्व विजेत्या पशुपालकांचा शाल, फेटा, श्रीफळ व ट्रॉफीसह गौरव करण्यात आला.

  त्याचबरोबर इतर सहभागी २६ स्पर्धकांना शाल श्रीफळ फेटा ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. व सहभाग घेतल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.  विजेत्या पशुपालकांचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, पुणे येथील व्यावसायिक दीपक जगताप, उद्योजक सुनील दादा भोसले,  सतीश दादा मंदाडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक   विकास बारकुल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

 या स्पर्धेमध्ये पंच म्हणून  राजाभाऊ पवार पाटील,  बाबा कुरेशी,  आशिष गोटू कदम, अनंत कुराडे यांनी काम पाहिले. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये शिवशाहीर अनिल माने यानी बक्षीस क्रमांकाचे नियोजन केले. सदरील स्पर्धा मनोगत   सिनगारे तथा पशुप्रेमी मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव येथे मोठया उत्साहाने व रोमहर्षक वातावरणात पार पडली. या कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून श्री डोंगरे साहेब सोलापूर यांनी काम पाहिले.

 स्पर्धेचे उद्घाटन  आ. राणाजगजितसिंह पाटील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोहित पाटील, सुनील मामा उंबरे, कलीम शेख, पप्पू मेटे, महेश बागल, गजानन गवळी, धीरज वीर, उदय काकडे, सुनील मुंडे, भाऊ रायबान यांनी काम पाहिले. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर ॲड. नितीन भोसले, युवराज राजनिंबाळकर, ॲड. विष्णू डोके इत्यादी उपस्थित होते.


 
Top