उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता युवा मोर्चाची भाजपा कार्यालय, प्रतिष्ठान भवन येथे आढावा बैठक पार पडली. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. राणाजगजिसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सूचनेवरून, भारतीय जनता युवा मोर्चा उस्मानाबाद प्रभारी व प्रदेश सचिव अमोल निडवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न होऊन भारतीय जनता युवा मोर्चाची धन्यवाद मोदीजी अंत्योदय ते भारत उदया या अभियानाची उस्मानाबाद व तुळजापुर मधुन सुरु करण्यात आली.

 या बैठकी प्रसंगी अमोल निडवदे यांनी मार्गदर्शन केले व आपण युवा मोर्चा म्हणून येणाऱ्या काळात काय काम करायचे आहे आपल्या जबाबदाऱ्या याविषयीची माहिती दिली.

 उस्मानाबाद जिल्हयातील केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवलेल्या लाभार्थ्यांच्या हस्ताक्षरात धन्यवाद मोदीजी असे पोस्ट कार्ड भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठवण्यात येणार आहेत. साधारणत: ७ हजार पोस्ट कार्ड जिल्हयातून पाठवण्यात येणार आहेत. गाव व शहरात प्रभाग तिथे भारतीय जनता युवा मोर्चा ची युवा वॉरियर्स शाखा करण्याचा संकल्प केला आहे तसेच २०२४ पर्यंत नविन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रभाग तेथे कॅम्प लावण्यात येणार आहे. यावेळी या अभियानांसाठी संयोजकांच्या निवडी करण्यात आल्या.

 सचिन लोंढे यांची धन्यवाद मोदीजी पोस्ट कार्ड साठी जिल्हा संयोजक म्हणून तसेच प्रविण घुले यांनी मन की बात जिल्हा संयोजक व गणेश देशमुख यांची नव मतदार नोंदणी अभियान यासाठी जिल्हा संयोजक म्हणून निवडी करुन जबाबदारी देण्यात आली.

 यानंतर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी मार्गदर्शन केले व जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व त्यासाठी युवा मोर्चा ताकतीने उपक्रमशील राहील असे सांगितले. याप्रसंगी सुनिल काकडे, अभय इंगळे, सुजित साळुंके, शेषेराव उंबरे, प्रवीण शिरसाठे, देवा नाईकल, अमोल राजेनिंबाळकर, सुनील पंगुडवाले, नरेन वाघमारे, प्रितम मुंडे, वैभव हंचाटे, प्रसाद मुंडे, अमित कदम, गणेश इंगळगी, गणेश मोरे, जगदीश जोशी, विकास मुंडे, अशोक मुंडे, अमोल चव्हाण, संजय नेम्हाणे, समाधान घुले, सागर दंडनाईक, बीन्नी तावसकर, सार्थक पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top