तुळजापुर/ प्रतिनिधी- 

श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक करण्यासाठी आँनलाईन पासेस पध्दत सुरु करण्यात आली होती. माञ काही अपप्रवृत्ती या अभिषेक आँनलाईन पासेसचा गैरवापर करीत  असल्याच्या पार्श्वभूमीवर अभिषेक आँनलाईन पासेसची कसुन चौकशी करुन मगच त्यांना देवीगाभा-यात अभिषेकासाठी  सोडण्यात येत आहे.

 श्री तुळजाभवानी मंदीरातील खाजगी सुरक्षा रक्षकास आँनलाईन पद्धतीने काढण्यात आलेल्या भाविकाचे आधार कार्ड पाहुनच अभिषेक हाँल मध्ये सोडण्यात यावे ,असे आदेश देण्यात आले . यापुढे ही आँनलाईन पद्धतीने काढण्यात आलेल्या अभिषेक पास बाबतीत खाञीने तपासणी करुनच भाविकांना सोडण्यात यावे अशी मागणी पुजारी वर्गातुन केली जात आहे.


 दोषींवर कारवाई होणार -कदम 

अभिषेक पासेस पाहुन  नावांची खाञी व  कसुन तपासणी करुन भाविकांना अभिषेकासाठी देवी गाभाऱ्यात सोडले जात असुन बोगस पासवर भाविकांना अभिषेक रांगेत सोडण्या-या संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती मंदीराचे धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक विश्वास कदम यांनी दिली.

 
Top