उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने कुटील कारस्थान करुन खाली खेचले व या सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक विकास कामांना स्थगिती दिली. त्यामुळे महावितरणचे ट्रान्सफार्मर बसविण्याची कामे थांबविली गेली. शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची अनेक कामे स्थगित केली. या शासनाच्या निर्णयाने राज्यात व शहरात अनेक विकास कामे खोळंबुन राहिली आहेत. शहरातील दुरावस्था झालेली उद्याने (जिजामाता उद्यान व संभाजी उद्यान) यांना मंजूर झालेला कोट्यावधीचा निधी तसेच आठवडी बाजाराचा विकास ही कामे ह्या सरकारने स्थगित करुन उस्मानाबाद शहरावासिंयांवर अन्याय केला आहे.  त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यांचे सरकार आले म्हणुन विरोधी व द्वेष भावनेतून वागणे हे सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे त्यांनी विरोधाला विरोध म्हणुन सर्वसामान्य जनतेस वेठीस धरु नये असे आवाहन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद शहरातील  िवकास कामांच्या भुमीपुजन प्रसंगी केले.  यावेळी माजी नगराध्यक्ष व जेष्ट नेते नानासाहेब  पाटील व  आ.कैलास पाटील यांची  प्रमुख  उपस्थिती  होती.
 यावेळी  रा.मा. 238 ते शिवनारायणी एंटरप्रायजेस ते राज्यमार्ग 52 पर्यंत काँक्रीट, हॉटमिक्स रस्ता व नाली करणे , बँक कॉलनी ते NH-52 पर्यंतच्या रस्त्याची सुधारणा करणे  , समर्थ नगर व केशव नगर येथे काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे  D. महात्मा गांधी नगरमध्ये काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे या विकास कामांचे अंदाजित रक्कम रु. 4 कोटी 47 लक्ष किमतीच्या विकास कामांचे भूमिपुजन पार पडले.  याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय  सस्ते, पप्पु मुंढ ,   दिपक जवळगे, सिद्धेश्वर कोळी  , सोमनाथ गुरव, रवी वाघमारे  , रोहित निंबाळकर, बाळासाहेब काकडे, तुषार निंबाळकर, राजाभाऊ पवार, महेबूब भाई पटेल, गणेश बप्पा खोचरे, बापू साळुंखे, बंडू आदरकर, पंकज पाटील, चेतन वाठवडे, उदय पाटील सत्यजित पडवळ, गफूर शेख, मुजीब काझी, उप अभियंता मोहिते, शाखा अभियंता काळे, दिनेश बंडगर, H M देवकते, विनोद थोडसरे, अगरचंद खोत, सतीश शिंदे, बहिरे अप्पा, धनंजय पाटील, सुधीर पवार, नानासाहेब घाडगे, प्रशांत जगताप यांच्यासह नागरिक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top