तुळजापुर/ प्रतिनिधी- 

प्रस्तावित सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी,काटी, सावरगाव, सांगवी, देवकुरुळी येथील शेतकऱयांनी भूसंपादनास प्रचंड विरोध केला असून, मोबदला कसा देणार या बाबत स्पष्टीकरण मागितले आहे.यावेळी मोजणीसाठी आलेल्या  प्रतिनिधी ला विविध मागण्याच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील ११ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहेत ,त्यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करणे आवश्यक असून त्याचबरोबर भूसंपादनाचा मोबदला कसा देणार याबाबत माहिती मिळणे गरजेचे आहे,  नोटिफिकेशन जाहीर करताना जिरायती क्षेत्र दाखविण्यात आले आहे, परंतु वास्तविक बागायती क्षेत्र पासून भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचा दावा करण्यात आला, ज्या जमिनी सुरत -चेन्नई राष्ट्रीय महामार्गात घेतल्या जाणार आहेत, त्या बहुतांशी बागायत आहेत ,यामुळे सर्विस रोड अंडरपास या संदर्भात काय धोरणआहे, अशी माहिती मिळावी ,संबंधित होणाऱ्या अनेक जमिनीमध्ये कोठेसा आनेवारीप्रमाणे प्रत्यक्ष जागेवरून मोजणी करून त्यामधील द्राक्ष बागा, फळबागा, ऊस विहिरी तळे घर या संदर्भात माहिती देण्यात आली नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांना रोख रक्कम अदा केल्याशिवाय जमिनी ताब्यात देणार नसल्याची भूमिका यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी घेतली.  त्यानंतर विविध मागण्याचे निवेदन महामार्गाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, खुंटेवाडी चे उपसरपंच महादेव जाधव , बाबासाहेब कापसे यांच्यासह तालुक्यातील ११ गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
Top