उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये शेतकरी शेतमजूर संघटनेचे संस्थापक कोंडाप्पा कोरे यांनी सर्वानुमते नियुक्तीचे पत्र देऊन शेतकरी शेतमजूर संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी शंकर गायकवाड तर राज्य कार्याध्यक्षपदी मारुती कारकर यांची निवड केली, 

यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, मी सध्या कै.मा. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेमध्ये राज्य उपाध्यक्ष असून या दोन्ही संघटनांची विचारधारा एकच असल्यामुळे व कोंडाप्पा कोरे हे शरद जोशींना मानणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी मला दोन्ही संघटनांमध्ये काम करण्यासाठी संमती दिल्यामुळे आज पासून मी दोन्ही संघटनेमध्ये क्रियाशील राहणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी बोलताना सांगितले. मारुती कारकर हे परंडा तालुक्यातील शेतकरी असून त्यांनी यापूर्वी शेतकऱ्यांसाठी खूप आंदोलने केलेली आहेत व ते सतत सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी होत असतात. या कार्यक्रमात दोघांच्या निवडी जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व बहुसंख्य शेतकऱ्यांनी गायकवाड व कारकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top