उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 वारकरी संप्रदायातील मानाचा श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज पुरस्कार शिवाजीराव गिड्डे पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. तसेच श्री संत गणेशनाथ महाराज शतकोत्तर अमृत महोत्सव विशेष पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक व सामाजिक चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते प्रा. सोमनाथ लांडगे यांना देण्यात आला. या दोघांना पुरस्कार 

 मिळाल्याबद्दल गजर समतेचा या उपक्रमा अंतर्गत संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर (जगद्गुरु तुकोबाराय यांचे वंशज) यांचे शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाला अध्यक्ष  म्हणून मा. रमेशजी पांडव (ज्येष्ठ विचारवंत ) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून 

मा. प्रा. अविनाश सांगोलेकर (मा. मराठी विभागप्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), मा. उमाकांत माने (सामाजिक कार्यकर्ते) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.,

हा कार्यक्रम रविवार दि. २७ नोव्हेंबर सकाळी १०:३० वा.

स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, डेक्कन कॉर्नर, कर्वे रोड, पुणे होणार आहे.  या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक श्री सचिन पाटील व संत चोखामेळा अध्यासन केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top