उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील शोषीत पिडीत, गोरगरीब समाजाला  स्वतंत्र जिवन जगता यावे म्हणून लोकशाहीवादी संविधान अहोरात्र प्रयत्न करुन तयार केले.व भारत देशाला अर्पण केले, म्हणुन आज आपण या भारत देशामध्ये स्वतंत्र जिवन जगत आहोत.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी२६ नोव्हेंबर १९४९ रोजी या भारत देशाला संविधान अर्पण केले.तो संविधान दिन साजरा करत असताना.देशाला संविधान अर्पण करत असलेले छायाचित्र प्रत्येक शासकिय व निमशासकीय कार्यालयात लावुन संविधान दिन सक्तिने साजरा करण्यात यावा.तर जे शासकीय व निमशासकीय कार्यालये भारतीय संविधान दिन साजरा करणार नसतिल त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करुन सेवेतुन निलंबित करण्यात यावे.व प्रत्येक कार्यालयाकडून भारतीय संविधान दिन साजरा केल्याचा अहवाल मागविण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष संदिपान कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब अणदुरकर, गौतम धावारे, जगदिश कार्लेकर यांच्या स्वाक्षर्या आहेत.


 
Top