उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सिंदगाव, ता. तुळजापूर येथील-  विलास लक्ष्मण भोसले, वय 53 वर्षे,किरण विलास भोसले, वय 22 वर्षे, विशाल परमेश्वर शिंदे, वय 22 वर्षे या तीघांनी खून केल्या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 302, 307, 34 अंतर्गत गुन्हा क्र. 53/2020 नोंदवण्यात येउन या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक-डी.जे. चव्हाण यांनी करुन तपासाअंती गुन्ह्याचे दोषारोपपत्र उमरगा सत्र न्यायालयात दाखल केले होते.

यात साक्षीदारांच्या साक्ष, परिस्थितीजन्य पुरावे तसेच शासकीय अभियोक्ते श्रीमती- एस.एम. देशपांडे यांच्या युक्तीवादातून या सत्र खटला क्र. 22/2021 ची सत्र न्यायालय, उमरगा येथे सुनावणी होउन आज दि. 24.11.2022 रोजी मा. सत्र न्यायाधीश श्री. अनभुले यांनी उपरोक्त नमूद तीन्ही आरोपींना भा.दं.सं. कलम- 302, 307, 34 च्या उल्लंघनाबद्दल जन्मठेप व प्रत्येकी 1,000 ₹ दंड अशी शिक्षा सुनावली आहे.


 
Top