उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील प्रसिद्ध कवी तथा आदर्श शिक्षक हणमंत पडवळ यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘जगणे इथेच संपत नाही’ या काव्यसंग्रहाला नुकताच ‘दोस्ती फाउंडेशन, श्रीरामपूर’ यांच्यातर्फे पै मजनुभाई शेख यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ४ डिसेंबर २०२२ रोजी श्रीरामपूर येथे होणार आहे. यानिमित्त त्यांचा हृद्य सत्कार ‘कलाविष्कार अकादमी, उस्मानाबाद’ तर्फे करण्यात आला. कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे , राजेंद्र अत्रे , उस्मानाबाद येथील प्रसिद्ध साहित्यिक, कवी, लावणीकार, चित्रपट निर्माते रवींद्र शिंदे , प्रा. अभिमान हंगरगेकर , तौफिक शेख , बाबा गुळीग , अब्दुल लतीफ , गणेश वाघमारे , कलाविष्कार अकादमीचे शेषनाथ वाघ , सुदेश माळाळे, रियाज शेख, भागवत घेवारे या सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजेंद्र अत्रे व भागवत घेवारे यांनी हणमंत पडवळ यांच्या कार्याचा गौरव करून निपक्षपातीपणे मिळालेल्या या पुरस्काराने उस्मानाकरांची मान उंचावल्याचे सांगितले .

सत्काराला उत्तर देताना हणमंत पडवळ यांनी आनंद व्यक्त केला. तसेच यापुढेही सामाजिक बांधिलकी जपणारे लेखन माझ्या हातून होईल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी त्यांनी ‘जगणे इथेच संपत नाही’ या काव्यसंग्रहातील ‘जखमा आणि वेदना’ ही कविता सादर केली.


 
Top