उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

पोलीस शिपाई भरती साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्यावी  अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे  केली आहे, अशी माहिती खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी दिली. 

 महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या पदांसाठी एकुण 18331 जागांसाठी संपुर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागविण्यात येत आहेत. दि. 09/11/2022 रोजी पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 30/11/2022 आहे. परंतु ऑनलाईन संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याने उमेदवारांना अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याच्या अनेक प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या भविष्याचा विचार करुन पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस   यांच्याकडे केली.

 
Top