तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मंदीराच्या प्रशासकीय कार्यालयाच्या मागे असलेल्या  शौचालयाचा टाकी जवळच्या  खड्ड्यात मोकाट फिरणारी गाय पडुन मरण पावल्याची घटना गुरुवार दि. ११रोजी घडली .

 या बाबतीत अधिक माहीती अशी की, तुळजापूर शहरात सर्वञ मोकाट जनावरांचा संचार सुरु असुन या मोकाट जनावरांच्या हल्यात अनेक भाविकांनसह नागरिक जखमी होवुन सुध्दा नगरपरिषद या समस्या कडे लक्ष देत नाही.

बुधवार राञी एक मोकाट गाय मंदीर प्रशासकीय कार्यालया लगत असलेल्या सुलभ शौचालय कडे गेली व तिथे लगत असलेल्या शौचालय टाकी शेजारील छोट्या खड्ड्यात पडली सदरील खड्डा आठ ते  दहा फुट खोल व दोन ते अडीच फुट रुंद आहे.  गुरुवार    सकाळी ही गाय मेलेल्या अवस्थेत आढळुन आली ती फुगल्याने तिला बाहेर  काढण्यासाठी कप्पी आणुन ती लावुन तिला खड्ड्यात पडलेली गाय वर उचलुन नगरपरिषद वाहनात ठेवुन ती कचरा केंद्रा लागत आणुन खड्डा खाणुन तीचा वर विधीवत अंत्यसंस्कार केले .यासाठी नगरपरिषद स्वछता विभाग प्रमुख दत्ता सांळुके सह त्यांच्या सहकाऱ्यानी परिश्रम घेतले.  


 
Top