तुळजापूर / प्रतिनिधी-,

भारताला स्वंतञ मिळुन आज पंचाहतर वर्ष झाल्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात बुधवार दि.२३रोजी  प्रथमच एसटीचे काक्रंबावाडीत आगमन झाल्याने ग्रामस्थांनी एसटीचे पुजन करुन चालक वाहक  यांचा फेटा बांधुन सत्कार केला व एसटी गावात प्रथमच आल्याच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव साजरा केला.

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी गावात देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेली तरी बससेवा न्हवती. यामुळे शालेय विद्यार्थी यांना पायपीट करीत शिक्षणासाठी परगावी जावे लागत होते.शालेय विद्यार्थ्या बरोबरच वृद्ध, रुग्ण यांचे ही हाल होत होते. 

 अखेर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मात्र या काक्रंबावाडीत एसटी बस अवतारली. सदरील बस तुळजापूर हुन कार्ला तेथुन काक्रंबावाडी काक्रंबा ते तुळजापूर अशी धावणार आहे. या बसचे पुजन उपसरपंच अनिल बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  रामचंद्र बंडगर निवृती कोळेकर महादेव शिंदे  नितीन कोकरे  दत्ता कोळेकर श्रीमंत कोकरे हरिदास कोळेकर अकुंश कोळेकर महेश कोळृकर दशरथ कोळेकर  सह ग्रमस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.


 
Top