उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी दि.29 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर झाली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू आहे. या योजनेंतर्गत दि.13 ऑक्टोबर 2022 रोजी 40 हजार 483 लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी दि.22 नोव्हेंबर 2022 पर्यंत 38 हजार 198 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. त्यापैकी 34 हजार 471 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम 101 कोटी 60 लाख रुपये जमा करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने चालू आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.

दि.22 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील 2 हजार 285 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करतेवेळी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय कमीटीकडे ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या आहेत, त्यांनी जिल्हा उपनिबंधक, तालुका  सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क करुन तक्रारीचे निराकरण करावे.

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. तसेच ऑनलाईन तक्रारीचे निराकरण करुन घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे आणि सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे. 


 
Top