उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोल्हापूर ते नांदेड या मार्गावर निघालेल्या  स्वराज्य इंडिया संघटना आणि समविचारी संघटना यांच्या वतीने भारत जोडो यात्रेचे तुळजापुरात जोरदार स्वागत करण्यात आले. काँग्रेस सेवा दलाचा वतीने   या यात्रेचे स्वागत केले. ही यात्रा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेमध्ये 9 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे सहभागी होत आहे.

 9 नोव्हेंबर रोजी देगाव जिल्हा नांदेड येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातून निघालेली यात्रा सहा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता तुळजापुरात पोचली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या यात्रेचे स्वागत सेवा दलाचे  तानाजी जाधव व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष लखन पेंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा ना रहा है असे म्हणत या यात्रेतील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली.

 त्यानंतर ह्या यात्रेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वराज इंडिया संघटनेचे राज्यप्रमुख ललित बाबर, राज्य उपाध्यक्ष सुभाष लोमटे, सविता शिंदे, मराठवाडा लोकविकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ तोडकर, विठ्ठल तोडकर, जिल्हाध्यक्ष सुभाष घोडके, सौ सुनंदा खराडे, विजय कदम, वामन पांडागळे त्यांच्यासह इतर 40 कार्यकर्ते या यात्रेमध्ये आले होते. तुळजापूर येथून लातूर मार्गे पुढील प्रवासासाठी ही यात्रा मार्गस्थ झाली

 
Top