उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नफरत छोडे, संविधान बचाव यात्रा कोल्हापूर ते देगलूर (नांदेड) ही 2 नोव्हेंबर पासून कोल्हापूर येथून निघालेली आहे. ती 8 नोव्हेंबर ला नांदेडे येथे पोहचणार आहे. यात्रेचे प्रमुख ललीत बाबर, सुभाष लोमटे, मानव कांबळे, वर्षा ताई देशपांडे, सुभाष घोडके, सविता शिंदे, विश्वनाथ तोडकर, धनाजी गुरव, बाबा नदाफ, ईस्माईल समडोळे, गोविंद गिरी, रामचंद्र काळे, कासम भाई, नंदु मोरे, प्रभा यादव, कल्पना मोहिते, राजु गांजवे, शबाना शेख, किरण कांबळे, अर्जुन जाधव, अनिल गजधने यांच्या समावेश आहे.

 ही यात्रा दि. 06/11/2022 रोजी उस्मानाबाद शहरात आली असता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभाग, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अंकुश पेठे व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने यात्रेतील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यात्रेतील पाहुण्यांनी सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पायी चालत गेली. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अंकुश पेठे, विजय बनसोडे, विजय गायकवाड, सुभाष लोमटे, माधवसिंग राजपुत, विश्वनाथ तोडकर, इत्यादींची संविधान बचाव या विषयावर भाषणे झाली. यावेळी नफरत छोड़ो, भारत जोड़ो, हम सब एक है, भारतीय संविधान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. शेवटी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सर्वांना शपथ देवून वाचन करण्यात आले. व यात्रेतील मान्यवरांना पुढील प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

 कार्यक्रमाचे आभार पोपट लांडगे व पुष्पकांत माळाळे यांनी मांडले, कार्यक्रमास गणेश वाघमारे, अब्दुल लतीफ, संजय गजधने, राजेंद्र धावारे, बाबा कांबळे, डॉ. रमेश बनसोडे, अतुल लष्करे, महादेव एडके, बनसोडे दादा, जनार्धन वाळवे, नवज्योत शिंगाडे, कैलास शिंदे, इत्यादींची कार्यक्रमास उपस्थिती होती


 
Top