उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला असून ते सतत अवमानकारक विधाने करीत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी करीत काळे झेंडे दाखवून कोश्यारी यांच्या निषेधार्थ शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२१ नोव्हेंबर रोजी आंदोलन केले. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे एका निवेदनाद्वारे त्यांना पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोशारी हे महाराष्ट्राचा मानबिंदू संपूर्ण भारतीयांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सतत निंदाजनक अवमानकारक विधाने करीत आहेत त्यामुळे भारतातील तमाम शिवप्रेमी शिवभक्त भारतीयांची मने अत्यंत दुखावलेले आहेत.संविधानिक व शासकीय पदावर राहून कोशारी हे राजकीय भाषा बोलतात.त्यांच्या विधानाने समाजात असंतोष पसरत आहे. समाजामध्ये अत्यंत तीव्र प्रकारचा संताप येत असल्यामुळे त्यांना याचा विचार करून पदावरून तात्काळ हटविण्यात यावे.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती,धाराशिवचे अध्यक्ष धर्मराज सुर्यवंशी,उपाध्यक्ष, रवी मुंडे,सचिव श्री.कंचेश्वर डोंगरे,संघटक श्री.मंगेश निंबाळकर,प्रवक्ता रवि पवार,आकाश कोकाटे,नागेश कदम,कृष्णा साळुंके,आकाश भोसले,अमोल पवार,कुणाल जानराव,मनोज मोरे,रियाज शेख,पाशाभाई शेख,दत्ता साळुंके, जयराज खोचरे,आकाश भोसले,नवेश खैरे,विशाल भोसले,राजकुमार ढोबळे,कृष्णा मानकेश्वरी,ईश्वर काळे,सत्यविजय मोहिते,अनिल सुर्यवंशी,सचिन गायकवाड,सौदागर पवार,सचिन खोचरे,विपीन वीर,किरण गायकवाड, संतोष घोरपडे,संजय डोंगरे,अजय जाधव इ.कार्यकर्ते उपस्थित होतो. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर घोषणांनी दुमदुमून सोडला यावेळी समितीचे भाव संकेत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शासन प्रशासनाचा देखील जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला.यात शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top