उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या वतीने मौजे वरुडा येथे सुरू असलेल्या श्रमसंस्कार शिबिरात डॉ. मारुती अभिमान लोंढे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पद आणि प्रतिष्ठेचा विचार न करता खऱ्या अर्थाने आपणाला जन्म दिलेल्या आई-वडिलांची आणि देशाची सेवा करायची असेल तर स्पर्धा परीक्षा हा एकमेव राजमार्ग आहे असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झाल्यास नक्कीच वाईट प्रवृत्तींना काळा बसतो असे डॉ . लोंढे म्हणाले.

        डॉ.लोंढे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेशित झाल्यानंतर केवळ आई-वडिलांच्या स्वप्नासाठीच जगावे आणि अधिकारी होऊन देश सेवा करावी. सदर कार्यक्रमासाठी डॉ. अवधूत नवले हे  उपस्थितीत डॉ.नवले यांनी देखील विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि नोकरी याविषयी मार्गदर्शन केले

 या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. माधव उगिले यांनी केले, सूत्रसंचलन कार्यक्रम अधिकारी प्रा. बालाजी नगरे यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. मोहन राठोड यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. मंगेश चेंडके डॉ. शिवाजी गायकवाड व प्रा.डॉ.सी.ई. महाडिक आणि महाविद्यालयातील स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते.

    सदर शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहे.


 
Top