उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 औरंगाबाद येथील उच्च न्यायालय खंडपीठाच्या उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे फिरते भ्रमंती वाहनाला प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ए. एस. शेंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फिरते भ्रमती वाहनाची रवानगी करण्यात आली.

 या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा न्यायाधीश वर्ग-1 आर. एस. गुप्ता, जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर, सदस्य बार कॉन्सिल महाराष्ट्र व गोवा एम. एस. पाटील, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस. आर. मुंढे तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, कर्मचारी, विधीज्ञ, पक्षकार मोठ्या संखेने उपस्थित होते. ·

 या फिरत्या भ्रमंती वाहनाद्वारे उस्मानाबाद आणि तालुक्याच्या खेडेगावामध्ये शासकीय योजनांची, नागरिकांच्या अधिकारांची जनजागृती करण्यात येणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी सांगितले आहे.


 
Top