उमरगा/ प्रतिनिधी-

तालुक्यातील येळी येथील माजी सैनिक तथा सोसायटीचे संचालक विश्वनाथ भगवंत कांबळे (वय ८२ वर्षे ) यांचे बुधवारी (दि.१६) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना निधन झाले. 

गुरुवारी येळी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. येळी येथील भाऊसाहेब बिराजदार स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र कांबळे यांचे वडील होते.


 
Top