तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात करण्यात येणारी विकास कामे नागरिक पुजारी व्यापारी प्रशाषण या सर्व घटकांचे मते विचारात घेवुन सर्वानुमते निर्णय घेऊन करणार असुन सर्व प्रथम देविजींचा सुवर्ण गाभारा विकास काम  करण्यात येणार असल्याची माहीती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवार दि २५रोजी शासकीय विश्रामगृह येथे पञकारांशी बोलताना दिले.

श्रीक्षेञ विकास कामे करताना प्रथमता सुवर्ण  देविगाभारा करणे नंतर शिखर रंगरंगोटी विद्युत रोषणाई स्वाछता याला प्राधान्य दैणार असुन मंदीर महाध्दार परीसर स्वछता मंदीर कडे दिले जाणार आहे तसेच श्रीतुळजाभवानी मंदीर साठी स्वतंत्र अतिरिक्त जिल्हाअधिकारी ऐक उपविभागीयपोलिसअधिकारी दोन पोलिस निरक्षक पदे शाषणाकडे मागीतले आहेत तसेच पन्नास वार्डन तैनात करण्याचा मानस आहे तिर्थक्षेञ तुळजापूर येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे स्पष्ट केले.

श्रीतुळजाभवानी मंदीर देवस्थान हे राष्ट्रीय सरंक्षित स्मारक नाही तर राज्य संरक्षित स्मारक आहे देवि गाभाऱ्यात आँक्सीजन भरपूर येण्यासाठी दरवाजा साईज वाढवावा लागणार आहे .श्रीतुळजाभवानी मंदीरात  दहा हजार अमुल्य अतिप्राचिन वस्तु असुन त्यासाठी भव्य दिव्य संग्रहालय उभारुन त्यात या वस्तु ठेवण्यात येणार आहे.श्रीक्षेञ विकास कामात देविजींच्या धार्मिक कुलधर्मकुलाचार साठी स्वतंत्र जागा बाबतीत नियोजन करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली .तिर्थक्षेञ तुळजापूर चा विकास बालाजी धर्तीवर करणार असुन त्या पार्श्वभूमीवर बालाजी दौरा करुन तेथील कामकाज पाहणी केली यानंतर उज्जैन काशी येथे पाहणीसाठी जाणार असल्याचे यावेळी म्हणाले .व्हीआयपी  दर्शन साठी आपण वेळ निश्चीत करण्यात येण्याचे नियोजन आहे.प्रशाद योजनेसाठी महाविकासआघाडी सरकार काळात अपेक्षित प्रयत्न केले नाही माञ आता  हक्काचे सरकार आल्याने काम सुरु झाले आहे. 2018ला ८० लाख भाविक आले होते आता याचा तीन पट म्हणजे अडीचकोटी येणार असे गृहीत धरुन विकास कामे केले जाणार आहेत. श्रीक्षेञ विकास कामांन बाबतीत कुणाला काही सुचना करावयाचा असल्यास लेखी स्वरुपात कराव्यात, असे आवाहन यावेळी केली. 

यावेळी नितीन काळे , नारायण नन्नवरे , सतिश दंडनायक,  सज्जन सांळुके,  सचिन रोचकरी, आनंद कंदले, बाळासाहेब शिंदे, अभिजीत कदम  नरेश अमतराव आदींची उपस्थिती होती. 


 
Top