उस्मानाबाद / प्रतिनिधी 

शिंगोली आश्रम शाळेमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष  शिंदे.के.बी, प्रमुख पाहुणे चित्तरंजन राठोड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी  अध्यक्षांनी भाषणात शिंदे यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे असे मार्गदर्शन केले. विद्यार्थी व शिक्षकांचे मनोगत झाले. तांड्यामध्ये संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची घोषणा देत व बॅनर घेऊन, घोषणा फलक घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर पाटील व आभार प्रदर्शन   दीपक खबोले यांनी केले. या कार्यक्रमासाठी   सूर्यकांत बडदापुरे,  जाधव चंद्रकांत,  पडवळ .के.आर,  पाटील नागनाथ,  कैलास शानिमे , सतीश कुंभार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  गोविंद बनसोडे,  रेवा चव्हाण,  वसंत भिसे, बबन चव्हाण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top