तेर (प्रतिनिधी )

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निपुण भारत अभियानांतर्गत  घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्याना बक्षीस वितरण करण्यात आली.          

   या स्पर्धेतील विजेत्या पूजा भोंडवे , सुलभा देवकते ,वर्षा डोलारे ,रागिणी माने ,अश्विनी ढोबळे , नंदिनी ढोबळे , वनिता देशमुख ,सीमा कदम , गोरे रेश्मा , अश्विनी हजारे या मातांचा त्याचबरोबर प्रश्नमंजुषा स्पर्धेतील  प्राची कोकरे ,गौरी शिरगिरे , नंदिनी पडुळकर , समीक्षा थोरात , अमृता भोंडवे , संध्या शिंदे या विजेत्यांना केंद्र प्रमुख  अनिल पडवळ , मुख्याध्यापक विक्रम खडके यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले .यावेळी मुख्याध्यापक खडके विक्रम , यरकळ गणपती , गोरोबा पाडुळे , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे ,  शेजाळ वर्षा , देशमुख शशिकांत , चौरे गोरख , नाईक उषा , मुंढे प्रभावती , हलसीकर रोहिणी , बंडगर लता , पांचाळ शकुंतला आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते. 

 
Top