तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथे वाहतूक कोंडीचा ञास होवु नये यासाठी तिर्थक्षेञ तुळजापूर विकास प्राधिकरणातुन लाखो रुपये खर्चुन  शहरात उभारण्यात सिग्नल यंञणा बंद असल्याने सध्या गर्दी दिवशी  वाहतुक कोडी निर्माण  झाल्याने याचा ञास भाविकांनसह वाहन चालकांना बसत आहे.

दिपपावली सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्री गर्दी दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्यातच  २० ते २५ हजार वाहने शहरात दाखल होत आहे. या वाहनाच्या चालकाकडून वाहनकर ५० रूपए घेऊन त्यांना शहरात एट्री दिली जात आहे. त्यामुळे शहरात प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे.   शहरातील जुने  बसस्टँन्ड,   छत्रपती शिवाजी महाराज चौकासह बार्शी टी पाँईट चौक येथे लाखो रुपये खर्चुन सिग्नल यंञणा तयार केली होती.  कार्यान्वित झाल्या पासुन ते आजतागायत ही यंञणा चालुच  झाल्या नाहीत.  जुन ेबसस्थानक मधील अनेक सिग्नल खांब गायब झाल्याचे दिसुन येत आहे.   त्यामुळे बंद असलेले सिनल यंञणेची सखोल चौकशी करुन संबंधित दोषीवर कारवाई  करावी व सिग्नल यंञणा आतातरी   त्वरित चालू  कराव्यात, अशी मागणी   नागरिकातून केली जात आहे.


 
Top