तुळजापूर  / प्रतिनिधी-

   तुळजापूर विकास प्राधिकरण योजनेमध्ये मंजूर असलेल्या हुतात्मा स्मारक , जवाहर गल्ली , आर्य चौक  , ते साळुंके गल्ली , किसान चौक या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षापासून रखडलेले आहे. तसंच या रस्त्याची रुंदीकरण करण्याची मागणी  या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,   तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत हुतात्मा स्मारक जवाहर गल्ली, आर्य चौक ते साळुंके गल्ली किसान चौक या रस्त्याचे   रुंदीकरणाचे काम मंजूर झालेले आहे . परंतु या भागातील रस्ता रुंदीकरणाचे काम वर्षांनुवर्ष रखडलेले असून याचा फटका या भागातील रहिवाशांना बसत आहे . हा रस्ता अरुंद असल्याने या भागात कायम वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे . तरी   या भागातील सर्व रहिवाशांच्या वतीने  सदरील विषयामध्ये तात्काळ लक्ष घालून हा विषय कायमस्वरूपी मार्गी लावावा अशा मागणी चे निवेदन  पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके,  नागनाथ भांजी,  विपीन शिंदे ,  नगरसेवक रणजित इंगळे,आनंद जगताप,  गणेश इंगळे , गोकुळ भांजी, गोकुल मगर , गणेश साळुंके, गणेश अणदूरकर, मयूर शिंदे, नानासाहेब नाईकवाडी, हेमंत   कांबळे , अभिजीत सांळुके  आदींनी दिले. 


 
Top