उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय महामार्ग क्रं 65 जुना 9 च्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही.या व अन्य विषयास अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजाभाऊ यांनी शुक्रवार  दि.:25/11/2022  रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय महामार्गावर मौजे दाळिंब (ता.उमरगा ) येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे  जिलाधिकारी यांना दिला आहे.  

निवेदनावर मनसेचे शाहूराज माने, बाबुराव टिकांबरे, पांडूरंग सारणे, खंडू सुरवसे, भीमा गायकवाड, सुधाकर सुरवसे, शंकर चव्हाण, गोजर बनसोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 
Top