तेर  / प्रतिनिधी-

 कर्तव्याची संख्या अकरा असून त्याचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबादचे सचिव न्या.वसंत यादव यांनी केले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात बालदिनाच्या निमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जनसाहस उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम प्रसंगी न्या.वसंत यादव बोलत होते.यावेळी बापूजी साळुंके विधी महाविद्यालयातील प्रा.डाॅ. संजय आंबेकर, महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.डी.बेद्रे, पत्रकार नरहरी बडवे,जनसाहसच्या जिल्हा समन्वयक साधना गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top