उस्मानाबाद / प्रतिनिधी-

५५ वी पुरूष -महिला (वरिष्ठ गट) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा रविवार दि. २०  ते  २४ नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा होणार आहे.  मराठवाड्यात प्रथमच उस्मानाबाद येथे होणाऱ्या या स्पर्धेचे उद्धाटन महाराष्ट्र ऑलम्पीक संघाचे अध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती भारतीय खो-खो महासंघाचे सचिव प्राध्यापक डॉ.चंद्रजीत जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी देशातून पुरूषांचे ३६ संघ तर महिला गटात ३४ संघ सहभागी होत आहेत. त्याच बरोबर व्यवस्थापक पंच, खेळाडू, दीड हजाराच्या जवळपास तर विविध क्रीडा क्षेत्रातील ५०० लोक या क्रीडानगरीमध्ये येत आहेत. प्राध्यापक जाधव यांनी प्रथमच मैदानावर मॅट वरील खो-खो क्रीडा स्पर्धेसाठी दोन मैदाने तयार करण्यात आली तर मातीमध्ये तीन मैदाने तयार आहेत. १५ हजार क्रीडा प्रक्षेक या सामान्यांचा आनंद घेण्यासाठी भक्कम अशी गॅलरी उभारण्यात आली आहे. सर्व खेळाडूची निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेतुन देशाचा संघ निवडण्यात येणार आहे.  या स्पर्धेत एअरपोर्ट अथॉरिटी , इंडो तिब्बत बॉर्डर पोलीस , इंडियन रेल्वे , बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स , ऑल इंडिया पोलीस फोर्स कंट्रोल बोर्ड या संघांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धा दोन सत्रात आयोजित करण्यात येणार आहेत.  या पत्रकार परिषदेस महाराष्ट्राचे सेक्रेटरी गोविंद शर्मा, प्रविण बागल, रहमान काझी, संदीप साळुंके, प्रा.बालाजी काकडे, सुनील बनसोडे आदी उपस्थित होते.

सन्मान करणार

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत राज्यातील गेल्या ५० वर्षांतील मान्यवर खेळाडूंसह शाहूराज खोगरे यांचा गुरू सन्मान म्हणुन सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळयात शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते यांचा या कार्यक्रमात सन्मान करणार आहोत, अशी माहिती प्रा.डॉ.जाधव यांनी दिली. 

 
Top