उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील उंबरे कोठा येथील रहिवासी रावसाहेब बाबुराव उंबरे वय 72 यांचे शुक्रवारी दि. 18 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दि.19 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास उंबरे कोठा येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.             

 त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, 2 भाऊ,1 बहीण, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते उल्हास (बुबा) उंबरे, शिराढोण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अमोल उंबरे यांचे वडील होते. श्रीपतराव भोसले हायस्कूलचे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक अशोक उंबरे यांचे बंधू होते.


 
Top