उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील मराठी कन्या शाळेत   देशमुख शितल जगन्नाथ ,   सुजाता शिवाजी सातपुते आयोजित व महाराष्ट्र राज्य महामंडळ कलाध्यापक संघ पुणे शाखा उस्मानाबाद जिल्हा कलाध्यापक संघ , जिल्हा संस्कार भारती यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला, रांगोळी , हस्तकला , नाट्यकलेची कार्यशाळा प्रशिक्षण आयोजन करण्यात आले असुन  उद्घाटन कलाध्यापक संघाचे लातूर विभागीय सहकार्यवाहक तथा जिल्हा सचिव शेषनाथ वाघ , जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख शिवाजी भोसले , आयोजक शितल देशमुख , संस्कार भारती रांगोळी प्रशिक्षक दत्ता वाडकर ,के.ई. एडके कलाध्यापक रवी तिगाडे, यांचे हस्ते करण्यात आले. 

सदरील कार्यशाळा प्रशिक्षण सप्ताहातील शनिवार, रविवार २०२२ ते मकर संक्रांतीच्या २०२३ पर्यंत असणार असुन कार्यशाळा प्रशिक्षणाच्या शेवटी प्रशिक्षणार्थ्यांची स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीसे समारंभपूर्वक देण्यात येणार आहेत असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले अश्याप्रकारच्या कार्यशाळेच्या आयोजनाने बाल मनामध्ये कलाचैतन्य निर्माण होण्यास मदत होते असे शेषनाथ वाघ यांनी मनोगत व्यक्त करुन पालकांनी अश्या कार्यशाळेत पाल्यास सहभागी करण्यासाठी आवाहन केले. कार्यशाळेसाठी प्रशिक्षण देण्याकरिता  गंगा पडवळ , विद्यापीठ नाट्यविभागाचे गणेश शिंदे , कार्यानुभव शिक्षिका  पी. डी.परतापुरे विषयवार तज्ञ उपस्थित राहणार आहेत . उदघाटन प्रसंगी पालक सौ. राऊत , शिक्षक प्रदीप गाडे, वेदपाठक उपस्थित होते सुत्रसंचालन व आभार साईराज पंडीत यांनी मानले .

 
Top