उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार च्या विरोधात निषेध आंदोलन  करण्यात आले.  यावेळी अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून राजीनामा  घेणे आवश्यक आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून होत आहे. 

या आंदोलनात  ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, संजय निंबाळकर, मसूद शेख,   अमित शिंदे,  श्याम घोगरे,    वाजिद पठाण, अयाज शेख,  मनोज मुदगल,राजकुमार पवार,अनिकेत पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील,  असद पठाण,  विशाल शिंगाडे,  विवेक घोगरे,   सतीश घोडराव, बाबा मुजावर, सौरभ देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, राष्ट्रवादी प्रेमी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

 
Top