उस्मानाबाद /प्रतिनिधी-

आघाडीचे सरकार पाडुन हिंदुत्वासाठी नवीन सरकार निर्माण करणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री यांच्या राज्यात महिलांचा मान, सन्मान मिळत नाही, त्यामुळे हिंदुत्वासाठी आलेल्या राज्यात महिलांना सन्मान द्यायचा नाही का ? असा सवाल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मनिषा पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

महिलांची मते घेऊन निवडून आलात त्याच महिलांचा  अपमान करून देखील अब्दुल सत्तार यांना मंत्री मंडळात ठेवले आहे. जोपर्यंत त्यांना पदमुक्त करणार नाहीत. तोपर्यंत कोणाला ही महिलांच्या सन्मानाविषयी काळजी वाटणार नाही, यापुर्वी ही यापुर्वी महिला नेत्याविषयी घरी स्वंयपाक करा, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले होते.या मंत्रीमंडळातील नेत्यांची मानसिकता दिसून येते.एखाद्या खासदार महिला विषयी, असे विधान करता मग सामान्य महिलाविषयी काय बोलता, असा संतप्त सवाल ही पाटीलयांनी उपस्थित केला. 

ओला दुष्काळ

बीडला कृषी मंत्र्यांनी ओल्या दुष्काळाची माहिती घेण्यासाठी आल्यानंतर दुरू पिता का ? असे जिल्हाधिकाऱ्यांना विचारले. ओल्या दुष्काळाची माहिती घेण्यासाठी त्यांनी ओल्या पार्टीचाच विचार केलेला दिसतो, अशी टिका ही मनिषा पाटील यांनी केली. यावेळी अॅड. कल्पना निपाणीकर,  महिला  मंजुषा खळदकर ,  रवीना बिराजदार,  रंजना भोजने,   सुनिता जगदाळे आदींची उपस्थिती होती. 

 
Top