उस्मानाबाद /प्रतिनिधी-

नवीन बागेची सुरुवात केल्यानंतर मनरेगा अंतर्गत २२ पकारच्या फळबागेला बाग जोपासण्यासाठी शासकीय अनुदान आहे. तर िजल्हयात रेशीम उद्योगाला ही मोठ्या प्रमाणात वाव आहे.  ज्या तुतीवर रेशीम उद्योग उभारलेला आहे. त्या तुतीलागवडीसाठी  रोहीया अंतर्गत ही मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान आहेत. व रेशीमला पण चांगला भाव आहे. विशेष म्हणजे हे सर्व कमी कष्टात व चांगले उत्पन्न देणारे आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन शेती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. 

 रेशीम उद्योग विकास योजनेतंर्गत जिल्ह्यात रेशीम अभियान राबविण्यात येणार असून दहा हजार एकरवर तुती लागवडीचे उद्दीष्ट निर्धारीत केले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मनरेगा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या फळबागे विषयी माहिती देण्यात येणार आहे.  जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सांगितले. पुढे  रेशीम अभियानाची माहिती देताना डॉ.ओम्बासे म्हणाले, जिल्ह्यात दहा हजार एकरवर तुती लागवडीचे उद्दीष्ट निर्धारीत केले आहे. रेशीम कार्यालयामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व पोकस अंतर्गत  हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाद्वारे मनरेगातुन रेशीम उद्योगाच्या विकास करण्यात येणार आहे. निकषाद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणारआहे. मनरेगा अंतर्गत तुती बाग लागवड व तीचे संगोपनासाठी गृहाची सोय केली आहे.

फळबाग लागवड-त्याच प्रमाणे मनरेगा अंतर्गत वैयक्तीक फळबाग लागवड करण्यात येणार असुन त्यासाठी लाभार्थी निवडीचे निकष ठरवीण्यात आले आहेत. या येाजनेत फळबाग, वृक्ष लागवडीस मान्यता दिली असुन आंबा, काजु, चिक्कु, पेरू, दाळींब, संत्रा, मोसंबी, घागरी, लिंबु, नारळ, बोर, सिताफळ, आवळा, चिंच, कवट, जांभुळ, अंजीर, शेवगा, हादगा, केळी, ड्रॅगन फु्रट, द्राक्ष, यांचा समावेश केला आहे.

यावेळी उपजिल्हािधकारी महेंद्र कुमार कांबळे, उपमुख्यकार्यकारी अिधकारी चकोर आदी उपस्थित होते. 

 
Top