परंडा / प्रतिनिधी - 

परंडा येथे आयोजित मंगळवार (दि.८ ) रोजी सकल मराठा आरक्षण महामोर्चा संदर्भात शांतता कमेटीची बैठक परंडा पोलीस ठाण्यात बुधवार ( दि.२ ) घेण्यात आली.यावेळी उपविभागीय अधिकारी रोहीणी नऱ्हे ,पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, तहसिलदार रेणुकादास देवणीकर, पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे, पोलीस उपनिरिक्षक विक्रांत हिंगे, बांधकाम उपविभाग अभियंता जालींदर मळगीकर, वैद्यकिय अधिकारी डॉ.देवदत्त कुलकर्णी, परंडा आगारप्रमुख  राहुल वाघमोडे, नगर परिषद मुख्याधिकारी मनिषा वडिपल्ले, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, महावितरण अधिकारी आदिसह सकल मराठा समिती पदाधिकारी उपस्थित होते .

     लाख ते सव्वा लाख संख्येने या महामोर्चात समाज एकवटेल असा अंदाज या बैठकीत करण्यात आला . त्या अनुषंगाने सर्व नियोजन प्रचार- प्रसार झाला असून सध्या सुरूच आहे . आम्ही प्रशासनाला सर्वोत्परी सहकार्य करू असे आश्वासन सकल मराठा समिती पदाधिकारी यांनी यावेळी दिले .पोलीस बंदोबस्त चोख राहील . तसेच मोर्चात अनुचित प्रकार  घडू नये . यावर पोलीसांची करडी नजर असेल . मोर्चा शांततेत व वेळेत होईल . याची काळजी घ्यावी . असे आवाहन यावेळी उपविभागीय अधिकारी रोहीणी नऱ्हे यांनी केले . मोर्चा मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत तसेच धुळ उडू नये यासाठी मुरुम - माती टाकलेल्या रस्त्यावर मोर्चा दिवशी सकाळी पाणी मारावे . मोर्चा मार्गावरील अडचण- अडथळे काढून मार्गावर स्वच्छता करावी, फिरते शौचालय ,आग्निशमक वाहन ठेवावे. आदि सूचना परंडा नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना करण्यात आल्या.मोर्चा दरम्यान बस वाहतूक तसेच ऊस वाहतूक व अवजड वाहने बंद ठेवावीत .मोर्चा मार्गावर कोणतेही दुचाकी व चारचाकी यासह इतर वाहन असू नये .बार्शी रोड, कुर्डूवाडी रोड, करमाळा , सोनारी रोड आदी त्या त्या मार्गाजवळ वाहन तळ असेल.अम्बुलंस व आरोग्य सेवा सज्ज असेल. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल.तसेच मोर्चा मार्गावरील विद्युत तारा व पोल याची पहाणी व दुरुस्ती केली जाईल.असे यावेळी महावितरण अधिकारी यांनी सांगीतले.

 
Top