परंडा / प्रतिनिधी : 

मराठा समाजाला विदर्भ व खानदेशातील कुणबी मराठ्यांप्रमाणे ओबीसी प्रवर्गातुन ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण महामोर्चा मंगळवार  दि .८ रोजी परंडा येथे ( जि. उस्मानाबाद ) आयोजित करण्यात आला असून या महामोर्चात लाखोच्या संख्येने मराठा बांधवांनी सहकुटूंब सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे .

 परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवार  दि. ४ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली व महामोर्चाचे नियोजन माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .    सभेच्या वेळी सुचनाचे पालन न करता काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास ताबोडतोब पोलीसाच्या ताब्यात दिले जाईल. मंचावर फक्त मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पाच मुली, पाच महिला व सुत्रसंचालन करणारा एक व्यक्ती उपस्थित असेल. सभा स्थळी जमलेल्या सर्व मराठा बांधवानी शांतता व स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.


 
Top