तुळजापूर/ प्रतिनिधी- 

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील घाटशिळ वाहन पार्किंग जवळ असलेल्या लाँजवर पोलिसांनी शनिवार   दि.१२ रोजी छापा टाकुन दोन प्रौढ  महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन दोन मोबाईलसह २३ रुपये रोख रक्कम जप्त केली.

  येथील घाटशीळ वाहन पार्कींग जवळ असलेल्या भक्त निवास & लॉज येथे लॉज चालक व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत . यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करून नमूद लॉजवर १७.३० वा . सु . छापा टाकला असता लॉजच्या दोन खोल्यांमध्ये २ प्रौढ महिला ( नाव- गाव गोपनीय ) आढळून आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दोन पुरुष असून ( नाव गाव गोपनीय ) ते त्या २ महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देऊन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करुन त्यांच्यावरती उपजिवीका करीत असल्याचे समजले , यावर पथकाने त्या लॉज चालक दोन्ही पुरुषांस ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल फोन व २,३०० रोख रक्कम असा माल हस्तगत केला . पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या दोन्ही महिलांची सुटका करून लॉज चालक दोन्ही पुरुषांविरुध्द भा.दं.सं. कलम ३७० ३७० ( २ ) , ३४ सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम ३ , ४ , ५ अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदवला आहे . 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि-  यशवंत जाधव , सपोनि मनोज निलंगेकर , तुळजापूर पो.ठा. चे सपोनि  सुशिल चव्हाण , स्था.गु. शा . चे पोलीस अंमलदार जावेद काझी , उलीउल्ला काझी , प्रकाश औताडे , दिलीप जगदाळे , सुभाष चौरे , धनंजय कवडे , शौकत पठाण , शैला टेळे , वैशाली सोनवणे , रंजना होळकर , बलदेव ठाकूर यांच्या पथकाने केली .

 
Top