तुळजापूर/ प्रतिनिधी- 

 येथील  न्यायालयात घेण्यात आलेल्या  लोकअदालती मध्ये  ४७८ प्रकरणात तडजोड होवुन मिटवण्यात आले.   दिवाणी न्यायाधीश क . स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती   एम . एम . निकम यांचे हस्ते करण्यात आले.

  यावेळी श्रीमती पी . एस . जी . चाळकर , सह दिवाणी न्यायाधीश क . स्तर ,   के . एस . कुलकर्णी , २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर ,  सदर लोकअदालतमध्ये  तालुक्यातून मोठ्या संख्येने प्रलंबित दिवाणी व फौजदारी २७ व दावा पूर्व एकुण २२ ९९ अशी एकुण ३५१६ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या ११३ प्रकरणांमध्ये तसेच वाद पुर्व प्रकरणांमध्ये ३७४ अशी एकुण ४८७ प्रकरणामध्ये तडजोड झाली. 

धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादी पक्षाला रुपये १६,०० , ४ ९ ३ / - वसूली झाली . दावा पुर्व प्रकरणांमध्ये रूपये ९९ , ६६,३६५ / - रक्कमेची संबंधीत ग्रामपंचायतीला , बँकेला , भारतीय संचार निगम लि . यांना वसूली झाली . त्याचबरोबर किरकोळ फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये आरोपींना दंडात्मक शिक्षा होवून रक्कम रू . १ ९ , ४०० / - इतका दंड करणेत आला . सदर लोक अदालतीस पक्षकार / विधीज्ञ बैंक कर्मचारी तसेच ग्रामपंचायत व नगर परिषद कर्मचारी यांचा उत्स्फुत प्रतिसाद मिळाला . तुळजापूर न्यायालयातील सर्व न्यायालयीन कर्मचारी , तुळजापूर विधीज्ञ संघाचे सर्व सदस्य , तुळजापूर पोलीस ठाणेकडील न्यायालयात नेमणूक असलेले पोलीस कर्मचारी यांनी सदर लोकअदालत यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले. 


 
Top